उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

Published on

इंदापूर, ता.६ : उजनी धरण क्षेत्रात मेमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे २० जून पासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते यामध्ये २० जून ते ३ जुलै या कालावधीत उजनी धरणाच्या दरवाजातील विसर्गाबरोबरच विद्युत प्रकल्पासाठी देखील एक हजार ६०० क्यूसेकने विसर्ग सोडला जात होता. या कालावधीत तब्बल ३.७८३ दशलक्ष युनिट म्हणजे ३७ लाख ८३ हजार युनिट वीज तयार झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि नगर जिल्ह्याच्या काही भागासाठी वरदान ठरलेले उजनी धरण यंदा मी महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सत्तरी पास करून पुढे चाललेले होते. यामुळे साठवण पाण्याचे योग्य नियोजन व्हावे म्हणून २० जून पासून उजनी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्याचवेळी वीज निर्मितीसाठी ही १ हजार ६०० क्यूसेक ने पाणी सोडण्यात आले.
यामध्ये समाधानकारक बाब म्हणजे धरणातून पाणी सोडायला सुरवात झाल्यापासून उजनी येथील विद्युत निर्मिती प्रकल्पातून दररोज तीन लाख युनिट (प्रतितास १,२५,००० युनिट) विजेची निर्मिती होत असते यामुळे २० जून पासून ३ जुलै रोजी पाणी बंद करण्यात आले.या १२ दिवसांच्या कालावधीत ३७ लाख ८३ हजार युनिट वीज निर्मिती करणे शक्य झाले अशी माहिती उजनी वीज निर्मिती केंद्रातील अधिकाऱ्यांनी दैनिक सकाळ प्रतिनिधीशी बोलताना दिली.


१२ दिवसात सोडले ३० ते ४० टीएमसी पाणी
उजनी धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांशी पहिल्यांदाच मे महिन्यात धरणाने ७० टक्के ची पातळी ओलांडली होती यामुळे धरण पाणीसाठ्याची संभाव्य धोकादायक पातळी विचार करता २० जून पासून पाणी सोडण्यात आले यामध्ये नदीपात्रासह कालवा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडण्यात आले. यामध्ये ३० ते ४० टीएमसी पाणी सोडून धरण पाणी पातळी ८० टक्केपर्यंत कायम राखण्यात आली.

उजनी धरणाची सद्यःस्थिती (६ जुलै सकाळी ६ वाजता)
एकूण पाणीसाठा - १०७.४६ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा - ४३.८० टीएमसी
टक्केवारी - ८१.७५
उजनीत येणारी आवक - १३९१९ क्यूसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com