सात लाखांचा ऐवज कालठणमध्ये चोरी
इंदापूर, ता. ९ : कालठण (ता. इंदापूर) येथे मंगळवारी (ता. ८) रात्री देवघराचे कुलूप तोडून चोरट्याने घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा एकूण ६ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला.
याबाबत प्रकाश संभाजी हराळे (वय ४८, रा. कालठण नं. १) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. ८) रात्री
कालठण नं. १ येथे फिर्यादीच्या राहत्या घरात चोरट्याने कुलूप तोडून घरातून प्रत्येकी १ लाख ५० हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे गंठन, ५ हजार रुपये किमतीची सोन्याची ठुशी, ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीची दोन कर्णफुलाची जोडी, तीन हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण व २ लाख रुपये रोख, असा एकूण सहा लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.