इंदापुरातील ५८ ग्रामपंचायतीवर महिलाराज
इंदापूर, ता. ११ : इंदापूर तालुक्यातील एकूण ११६ ग्रामपंचायतींपैकी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले २० ग्रामपंचायतीच्या आरक्षण कायम ठेवत उर्वरित ९६ ग्रामपंचायतींसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीनुसार एकूण ५८ ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार आहे. क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांचे भरणेवाडी व जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांचे रुई हे गाव सर्वसाधारणसाठी, तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे बावडा हे गाव अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सरपंचपदासाठी राखीव राहिले आहे.
इंदापूर शहरातील वाघ पॅलेस येथे शुक्रवारी (ता. ११) तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीच्या सन २०२५ ते २०३० कालावधीत होणाऱ्या निवडणुकांसाठीची सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाली. यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे, निवडणूक नायब तहसीलदार विजय घुगे, नायब तहसीलदार स्वाती राऊत, केतकी कुलकर्णी, अविनाश डोईफोडे, महसूल सहायक राहुल पारेकर, दीपक पवार यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षांचे आजी- माजी पदाधिकारी, विविध गावचे आजी- माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींचे आरक्षण पुढीलप्रमाणे (कंसात ग्रामपंचायत संख्या)
अनुसूचित जाती महिला (८)- जाधववाडी, कचरवाडी (निमगाव केतकी), डाळज नंबर तीन, करेवाडी, तरंगवाडी, लासुर्णे, वालचंदनगर, काटी.
अनुसूचित जाती (७)- कचरवाडी (बावडा),गलांडवाडी नंबर दोन, बळपुडी, दगडवाडी, बावडा, अजोती, झगडेवाडी
अनुसूचित जमाती महिला (१)- तक्रारवाडी.
नागरिकांचा मागासवर्ग महिला (१३)- कडबनवाडी, जांब, रणमोडवाडी, चांडगाव, वरकुटे खुर्द, भावडी, भादलवाडी, वरकुटे बुद्रुक, घोरपडवाडी, लाकडी, पिंपरी बुद्रुक, अकोले, हगारवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (१४)- हिंगणगाव, गलांडवाडी नंबर एक, रेडा, माळवाडी,शेळगाव, थोरातवाडी, निरवांगी,बेलवाडी, सराफवाडी, जंक्शन, कळस, शिंदेवाडी, बिजवडी, डिकसळ.
सर्वसाधारण महिला (२७)- अंथुर्णे, आनंदनगर, सणसर, पोंधवडी, शेटफळगढे, तावशी,चिखली, निमसाखर, टण्णू, भिगवण,व्याहळी, कुरवली, कुंभारगाव, मानकरवाडी, चाकाटी, जाचक वस्ती, पिंपळे, शहा, पिंपरी खुर्द, सरडेवाडी, पळसदेव, पडस्थळ, पिठेवाडी, निमगाव केतकी, गोतोंडी, लोणी देवकर, म्हसोबाचीवाडी.
सर्वसाधारण (२६)- निरगुडे, कळंब, गिरवी, नरसिंहपूर, गोंदि,डाळज नंबर एक, कळाशी, भोडणी, बाभूळगाव, सपकाळवाडी,डाळज नंबर दोन, रेडणी, बोरी, भांडगाव, सराटी, न्हावी, निंबोडी, लाखेवाडी, मदनवाडी, काझड, भरणेवाडी, कौठळी, गंगावळण, वकीलवस्ती, रुई, पिटकेश्वर.
जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवलेले २० ग्रामपंचायतीचे आरक्षण
अनुसूचित जाती- कालठण नंबर दोन, भाटनिमगाव,
अनुसूचित जाती स्त्री- उद्धट, तरटगाव,
नागरिकांचा मागास प्रवर्ग- गोखळी
नागरिकांचा मागासवर्ग स्त्री- बोराटवाडी अगोती नंबर दोन, अवसरी,
सर्वसाधारण- कालठण नंबर एक, पंधारवाडी, अगोती नंबर एक, वडापुरी शेटफळ हवेली, सुरवड,
सर्वसाधारण स्त्री- खोरोची, पवारवाडी, शिरसाटवाडी, कांदलगाव, निरनिमगाव, लुमेवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.