इंदापूर तालुक्यात कही खुशी कही गम
इंदापूर, ता.१५ : इंदापूर तालुक्यात एक गट आणि दोन गणांची वाढ झाली आहे. यामुळे पूर्वीच्या गट आणि गणांच्या गावांमध्ये बदल झाल्याने काही खुशी, काही गम असे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे तालुक्यातून एक जिल्हा परिषद सदस्य आणि दोन पंचायत समिती सदस्य वाढणार असल्याने इच्छुकांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान या रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत.
इंदापूर तालुक्यात यापूर्वी जिल्हा परिषदेचे सात गट तर पंचायत समितीचे १४ गण होते. आता नवीन रचनेनुसार यामध्ये एका गटाची वाढ होऊन आठ तर पंचायत समितीचे १४ चे १६ गण तयार झाले आहेत. यामध्ये भिगवण, पळसदेव, वडापुरी, निमगाव केतकी, वालचंदनगर, लासुर्णे , काटी, बावडा असे आठ जिल्हा परिषदेचे गट तर पंचायत समितीचे भिगवण, शेटफळगढे, पळसदेव, बिजवडी, माळवाडी, वडापुरी, निमगावकेतकी, शेळगाव,बोरी, वालचंदनगर, लासुर्णे, सणसर, काटी, लाखेवाडी, बावडा, लुमेवाडी असे १६ गण नव्याने तयार झाले आहेत.
जिल्हा परिषद गट व गणनिहाय समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे : गट १ - भिगवण शेटफळगढे - भिगवण गण : भिगवण, तक्रारवाडी, डिकसळ, पोंधवडी, बंडगरवाडी, कुंभारगाव, मदनवाडी. शेटफळगढे गण : शेटफळगढे, पिंपळे, लामजेवाडी, निरगुडे, म्हसोबाचीवाडी, लाकडी, शिंदेवाडी, निंबोडी अकोले, वायसेवाडी, काझड.
गट २ - पळसदेव बिजवडी - पळसदेव गण : डाळज नं.१, डाळज नं.२, डाळज नं.३, पळसदेव, काळेवाडी, माळेवाडी, बांडेवाडी, न्हावी, भादलवाडी, बळपूडी, कौठळी, भावडी. बिजवडी गण : चांडगांव, गलांडवाडी १, नरुटवाडी, वरखुटे बुद्रुक, करेवाडी, लोणी देवकर, बिजवडी, वनगळी, राजवडी, गागरगाव पोंदकुलवाडी, गंगावळण, कळाशी, अगोती १, अगोती २,कालठण १. गट ३ - माळवाडी वडापुरी गट-माळवाडी गण : माळवाडी, कालठण २, माळवाडी, पिंपरी खुर्द, शिरसोडी, पडस्थळ, टाकळी, अजोती, सुगाव, शहा, सरडेवाडी,गोखळी, तरंगवाडी. वडापूरी गण : वडापूरी, कांदलगाव, तरटगांव, हिंगणगाव, बाभूळगाव, भाटनिमगांव, वडापूरी, गलांडवाडी २,अ वसरी, बेडशिंग, भांडगाव .गट ४ - निमगांव केतकी शेळगाव गट-निमगाव केतकी गण : निमगाव केतकी, व्याहाळी, कचरवाडी (नि.के), गोतोंडी, हगारवाडी. शेळगांव गण : शेळगांव, कडबनवाडी, रुई, थोरातवाडी, मराडवाडी, शिरसाटवाडी, निमसाखर.
गट ५- बोरी वालचंदनगर गट - बोरी गण : बोरी, कळस, पिलेवाडी, गोसावीवाडी,बिरंगूडवाडी जंक्शन, आनंदनगर, भरणेवाडी
वालचंदनगर गण : वालचंदनगर, अंथुर्णे, रणमोडवाडी, कळंब. गट ६ - लासुर्णे सणसर गट - लासुर्णे गणः बेलवाडी, लासुर्णे, थोरातवाडी, जांब, बंबाडवाडी, कुरवली, चिखली, कर्दनवाडी, परीटवाडी, चव्हाणवाडी. सणसर गण : सणसर, भवानीनगर, जाचकवस्ती, सपकळवाडी, तावशी, पवारवाडी, मानकरवाडी, उध्दट, हिंगणेवाडी, घोलपवाडी. गट ७ - काटी लाखेवाडी गट : काटी गण : काटी, रेडा, वरखुटे खुर्द, सराफवाडी, पिटकेश्वर, घोरपडवाडी, दगडवाडी, निरवांगी.
लाखेवाडी गण : लाखेवाडी, पंधरवाडी, रेडणी, शेटफळ हवेली, भोंडणी, झगडेवाडी ,जाधववाडी, खोरोची. गट ८ - बावडा लुमेवाडी गट : बावडा गण : बावडा, सुरवड, वकीलवस्ती, बोराटवाडी चाकाटी, पिठेवाडी. लुमेवाडी गण : निरनिमगाव, कचरवाडी (बावडा), सराटी, लुमेवाडी, गोंदी, ओझरे, पिंपरी बुद्रुक, गिरवी, टणू, नरसिंहपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.