इंदापूर नगर परिषद महाराष्ट्रात पहिली

इंदापूर नगर परिषद महाराष्ट्रात पहिली

Published on

इंदापूर, ता.१८ : स्वच्छ भारत अभियानांतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४ स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगर परिषदेने छोट्या शहरांच्या (२० ते ५० हजार लोकसंख्या) गटात देशपातळीवर पाचवा तर महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक पटकावण्याचा विक्रम केला आहे. देशभरातील १५८१ शहरांमध्ये इंदापूरची ही सर्वोच्च यशस्वी घोडदौड ठरली आहे.
केंद्र शासनाच्या वतीने आयोजित स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंदापूर शहराला कचरा मुक्त शहर थ्री स्टार मानांकन आणि ओडीएफ प्लस प्लस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. नगर परिषदेने देशातील १५८१ नगरपरिषदांमध्ये देशात पाचवा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील १६२ नगरपरिषदांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष
प्रथम मिळाल्याच्या यशामुळे इंदापूर नगर परिषद कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी फटाके फोडून, पेढे वाटून आणि एकमेकांचे अभिनंदन करून जल्लोष व्यक्त केला.

यामुळे बजावली उत्कृष्ट कामगिरी
• घरोघरी कचरा संकलन
• कचऱ्याचे सुयोग्य विलगीकरण व प्रक्रिया
• कचरा तक्रारींचे त्वरित निवारण
• सार्वजनिक व मार्केट परिसराची स्वच्छता
• जलस्रोत आणि सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवणे
• शहर सौंदर्यीकरण

यश केवळ नगर परिषदेचे नसून संपूर्ण इंदापूर शहरातील नागरिकांचा सन्मान आहे. स्वच्छतेविषयी सर्वांनी घेतलेली जबाबदारी, जागरूकता आणि कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक श्रम यामुळेच हे शक्य झाले आहे. ‘स्वच्छता हीच सेवा’ हे ब्रीद व कर्मचाऱ्यांची निःस्वार्थ मेहनत यामुळेच हे शक्य झाले आहे. आपले शहर शाश्वत आणि आदर्श शहर बनविण्याकडे आम्ही पुढेही पावले टाकत राहू.
- रमेश ढगे, मुख्याधिकारी इंदापूर नगरपरिषद

राज्यातील यशस्वी नगरपरिषदा
द्वितीय : कागल (कोल्हापूर)
तृतीय : बुटीबोरी (नागपूर)
चतुर्थ : शिरूर (पुणे)
पाचवा : राहुरी (अहिल्यानगर)
सहावा : रत्नागिरी (सावंतवाडी)
सातवा : शेंदुरजनाघट (अमरावती)
आठवा : देसाईगंज (गडचिरोली)
नववा : येवला (नाशिक)
दहावा : दत्तपूरधामणगाव (अमरावती)

05776

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com