इंदापूरात अपघातग्रस्त कारमधून मिळाली शस्त्रे

इंदापूरात अपघातग्रस्त कारमधून मिळाली शस्त्रे

Published on

इंदापूर, ता. ३० : इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर दोन गावच्या हद्दीत बेडसिंग रस्त्यावर भरधाव कार झाडावर जाऊन आदळली. या अपघात चालकासह सहप्रवासी जखमी झाला आहे. दरम्यान, कारमध्ये चाकू आणि कोयत्यासारखी धारदार शस्त्रे आढळल्याने सतीश बापू यमगर (रा. कौंठळी, ता. इंदापूर, जि. पुणे) आणि सूरज संजय सोलनकर (रा. झारगडवाडी ता. बारामती) या दोघांविरोधात इंदापूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत इंदापूर पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल अकबर बादशाह शेख (वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (ता. २८ जुलै) रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी सतीश हा कार (क्र. एमएच १६ सीएम ७३०२) भरधाव चालवत होता. त्याच्या या निष्काळजीपणामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. यात कारचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात दोन कोयते व एक चाकू आढळून आला. याप्रकरणी विनापरवाना शस्त्र बाळगून अपघात कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गायकवाड करत आहेत.

कारला दुचाकीची नंबर प्लेट
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त कारचा क्रमांक शासकीय संकेतस्थळावर तपासला असता तो अहिल्यानगर जिल्ह्यातील एका दुचाकीचा असल्याचे समोर आले. बनावट नंबर प्लेट लावून ते या भागात कशासाठी आले होते. तसेच त्यांच्याकडे अन्य काही हत्यारे होती का, याबाबतचाही तपास होणे आवश्यक असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com