इंदापुरात बेशिस्त वाहनचालकांना दणका
इंदापूर, ता. ३ : इंदापूर शहर व परिसरात परवान्यापेक्षा जास्त अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर, तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी, चारचाकी चालकांवर इंदापूर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ४२ वाहनांवर तब्बल ९४ हजार रुपये दंड केला.
इंदापूर शहर व परिसरात अनेक अवैध अवजड वाहने मुरूम, खडी व बांधकाम व्यवसाय साहित्याची वाहतूक करतात. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांनी अशा वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने वाहतूक नियंत्रण पोलिस कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी वाहतूक पोलिसांना समवेत घेत शहरात नियम मोडणाऱ्या ४१ वाहनांवर कारवाई करत ४२ हजार ५०० रुपयांचा दंड केला, तर रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या दोन अवजड वाहनांना ताब्यात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने ५१ हजार ५०० रुपयांचा दंड केला. एकूण ४३ वाहनांवर तब्बल ९४ हजार रुपये दंड आकारण्यात आला.
या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांच्यासह पोलिस हवालदार लखन साळवे, अण्णासाहेब हेगडे, हसीम मुलाणी, लक्ष्मण सूर्यवंशी, सुहास आरणे, पद्मसिंह शिंदे, अनिल नागरगोजे, अमोल खाडे, अकबर शेख, शोभा खरात यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, अशा प्रकारची कारवाई नियमित करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
नियम पाळा कारवाई टाळा
बारामती येथील अपघाताच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरामध्येही वाहनचालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती करण्यात येत आहे. ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या, तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळून कारवाई टाळावी.
- सूर्यकांत कोकणे, पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.