इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘आयडियल स्टडी ॲप’चे वाटप
इंदापूर, ता. ७ : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागामध्ये कोचिंग क्लासेस उपलब्ध नसतात, या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल आणि दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्या वतीने इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आयडियल स्टडी ॲपचे वितरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून इंदापूर तालुक्यातील महात्मा फुले विद्यालय, बिजवडी, उत्कर्ष विद्या मंदिर, कालठण नं. १ आणि प्रगती विद्यालय, लोणी देवकर या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या शाळांमधील इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना या ॲपचा लाभ मिळणार आहे.
या उपक्रमाबाबत रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन शहा म्हणाले की, ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी शहरात येणे शक्य होत नाही, त्यामुळेच हे ॲप त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा समावेश असलेले हे ॲप विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावेल आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा आहे.
याप्रसंगी रोटरी क्लब इंदापूरचे माजी अध्यक्ष नरेंद्र गांधी, सचिव प्रशांत घुले, धरमचंद लोढा, राकेश गानबोटे व भीमाशंकर जाधव उपस्थित होते. दरम्यान, या उपक्रमाबद्दल महात्मा फुले विद्यालय, बिजवडीचे मुख्याध्यापक विकास फलफले, उत्कर्ष विद्यामंदिर, कालठण नं. १ च्या मुख्याध्यापिका खैरुन्निसा शेख आणि प्रगती विद्यालय, लोणीचे मुख्याध्यापक लहू जाडकर यांनी रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या या उपक्रमाचे कौतुक करीत शैक्षणिक क्षेत्रात रोटरी क्लब ऑफ इंदापूरचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सांगत आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.