रेंगाळलेली इंदापूर नगरपरिषदेची प्रभागरचना जाहीर

रेंगाळलेली इंदापूर नगरपरिषदेची प्रभागरचना जाहीर

Published on

इंदापूर, ता.१९ : चार वर्षांपासून विविध कारणांनी रेंगाळलेल्या इंदापूर नगरपनगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना सोमवारी (ता.१८) जाहीर आली आहे. निवडणुकीसाठी दहा प्रभागांकरिता २० सदस्य निवडून देण्यात येणार आहेत. प्रभाग रचना विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या सहीनिशी नगरपालिकेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली. याबाबत सूचना व हरकतीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदवता येणार आहेत.

इंदापूर नगरपरिषदेची मागील निवडणूक डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती.त्यांची मुदत सन २०२२ मध्ये संपली. विविध कारणांनी गेली चार वर्षे निवडणुका लांबल्याने नगरपालिकेवर प्रशासक राज आहे. त्यानंतर आता न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या. यामुळे राजकीय हालचाली देखील आता गतिमान होऊ लागल्या. त्यामध्ये निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील दहा प्रभागातून २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. यापूर्वी नगरपालिकेत थेट नगराध्यक्ष व १७ नगरसेवक कार्यरत होते. मात्र नव्या प्रभाग रचनेनुसार थेट नगराध्यक्ष आणि २० नगरसेवक इतकी संख्या झाली आहे.नव्याने प्रकाशित करण्यात आलेली प्रभाग रचना काहींच्या सोयीची तर काहींच्या अडचणीची झाली असल्याने कहीं खुशी कहीं गम पाहायला मिळत आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या मूळ आगामी काळात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे.


इंदापूर नगरपरिषदेची प्रसिद्ध करण्यात आलेली प्रभाग रचना
प्रभाग क्रमांक :-१
सदस्यसंख्या :-२
लोकसंख्या :- २४११
अनुसूचित जाती लोकसंख्या - ३८७
अनुसूचित जमाती लोकसंख्या - ४७
प्रभागात समाविष्ट भाग :- महतीनगर,पोलिस लाईन,इरिगेशन कॉलनी,दत्तनगर

प्रभाग क्रमांक :-२
सदस्यसंख्या :-२
लोकसंख्या :- २३४७
अनुसूचित जाती लोकसंख्या - १३०
अनुसूचित जमाती लोकसंख्या - २६
प्रभागात समाविष्ट भाग :- श्रीराम सोसायटी बस स्टॅन्ड, आय कॉलेज


प्रभाग क्रमांक :-३
सदस्यसंख्या :-२
लोकसंख्या :- २६३९
अनुसूचित जाती लोकसंख्या - ४१०
अनुसूचित जमाती लोकसंख्या - २३
प्रभागात समाविष्ट प्रभाग :-सोनाई नगर भारती टॉवर,जय भवानी मंदिर परिसर खंडोबा मंदिर परिसर, गणेश नगर, सावता माळीनगर चा काही भाग

प्रभाग क्रमांक :-४
सदस्यसंख्या :-२
लोकसंख्या :- २४२८
अनुसूचित जाती लोकसंख्या - ८२
अनुसूचित जमाती लोकसंख्या - ३
प्रभागात समाविष्ट प्रभाग :- सावता माळीनगर काझी गल्ली, नेहरू चौक, मोमीन गल्ली,जंजाळ वाडा, कासार पट्टा,कुरेशी गल्ली

प्रभाग क्रमांक :-५
सदस्यसंख्या :-२
लोकसंख्या :- २५४७
अनुसूचित जाती लोकसंख्या - २५३

अनुसूचित जमाती लोकसंख्या - १०
प्रभागात समाविष्ट भाग :- अंबिका नगरपरिषद कार्यालय परिसर, पिसे गल्ली, बाजारतळ खडकपुरा, मारुती मंदिर परिसर
----
प्रभाग क्रमांक :-६
सदस्यसंख्या :-२
लोकसंख्या :- २५५१
अनुसूचित जाती लोकसंख्या - २३२
अनुसूचित जमाती लोकसंख्या - ६
प्रभागात समाविष्ट भाग :- मंडई सातबोळ,माळी गल्ली, तेली गल्ली,पिसेवाडा, शेख मोहल्ला,बटर गल्ली,रामदास पथ

प्रभाग क्रमांक :-७
सदस्यसंख्या :-२
लोकसंख्या :- २४०२
अनुसूचित जाती लोकसंख्या - ३२३
अनुसूचित जमाती लोकसंख्या - १९
प्रभागात समाविष्ट भाग :- सिद्धेश्वर मंदिर ठाकर गल्ली, कांबळे गल्ली, वेंकटेश नगर संपूर्ण

प्रभाग क्रमांक :-८
सदस्यसंख्या :-२
लोकसंख्या :- २७३१
अनुसूचित जाती लोकसंख्या - ३३६
अनुसूचित जमाती लोकसंख्या - ३२
प्रभागात समाविष्ट भाग :- श्री संत रोहिदास मंदिर परिसर, रामदास गल्ली, कुंभार गल्ली जुने पोस्ट ऑफिस परिसर, राजवेली नगर, एसटी डेपो परिसर, दूधगंगा परिसर बाबरस मळा
------
प्रभाग क्रमांक : ९
सदस्यसंख्या :-२
लोकसंख्या :- २७८७
अनुसूचित जाती लोकसंख्या - ५१४
अनुसूचित जमाती लोकसंख्या - १७९
प्रभागात समाविष्ट भाग :- सरस्वती नगर शाहूनगर, शिवाजीनगर

प्रभाग क्रमांक :-१०
सदस्यसंख्या :-२
लोकसंख्या :- २६७२
अनुसूचित जाती लोकसंख्या - १५९४
अनुसूचित जमाती लोकसंख्या - ००
प्रभागात समाविष्ट भाग :-डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर, साठेनगर, बजरंगनगर आठभाई मळा


इंदापूर नगरपरिषद प्रभाग रचना सारांश
एकूण प्रभाग - १०
निवडून द्यायचे सदस्य - २०
लोकसंख्या - २५५१५
अनुसूचित जातीची लोकसंख्या - ४२६१
अनुसूचित जमातीची लोकसंख्या - ३४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com