इंदापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे विद्यार्थ्याचा लॅपटॉप मिळाला परत
इंदापूर, ता. २८ ः पुण्याहून सोलापूरच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या विद्यार्थ्याची लॅपटॉपची गहाळ झालेली बॅग इंदापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे शोधण्यात यश आले. यामुळे संबंधित विद्यार्थ्यासह त्याच्या पालकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक करीत आभार व्यक्त केले.
पुण्यात आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारा श्रीकृष्ण सुतार हा तरुण गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यातील आपल्या गावी निघाला होता. पुण्याहून निघालेल्या एसटी बसने प्रवास करताना, मोडनिंब येथे पोहोचल्यावर त्याला आपला लॅपटॉप असलेली बॅग बसमध्येच कुठेतरी गहाळ झाल्याचे लक्षात आले. अचानक ही बाब लक्षात येताच त्याने तातडीने इंदापूरला परत जात बस स्थानकावरील पोलिस मदत केंद्रातील कर्मचारी सचिन बोंबे यांना याबाबतची माहिती दिली.
या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ हालचाल सुरू केली. बोंबे यांनी बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सदर बॅग घेऊन एक अनोळखी प्रवासी अकलूजकडे जाणाऱ्या बसमध्ये गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर इंदापूर पोलिसांनी अकलूज बसस्थानकाशी संपर्क साधला. तेव्हा संबंधित इसम बॅग बसमध्येच ठेवून निघून गेल्याचे समजले. शेवटी, पोलिसांनी दिवे येथे बॅग हस्तगत केली.
त्यानंतर, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या हस्ते श्रीकृष्ण सुतार व त्याच्या पालकांकडे लॅपटॉप असलेली बॅग सुपूर्द करण्यात आली. लॅपटॉप परत मिळाल्याने विद्यार्थ्याने आणि वडिलांनी इंदापूर पोलिसांचे आभार मानले. यावेळी पोलिस कर्मचारी सचिन बोंबे, वैभव गरड उपस्थित होते.
प्रवासात साहित्याची काळजी घ्या..
पुणे-सोलापूर महामार्गावर सतत वर्दळ असते. तसेच, सध्या गणेशोत्सवाचे दिवस आहेत. या पार्श्वभूमीवर एस. टी. बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे. यामुळे प्रवाशांनी सुरक्षिततेसाठी स्वतः बरोबर असलेल्या सामानाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
- सूर्यकांत कोकणे, पोलिस निरीक्षक, इंदापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.