तरंगवाडी तलावातील पाणी पिण्यासाठी द्या

तरंगवाडी तलावातील पाणी पिण्यासाठी द्या

Published on

इंदापूर, ता.१ : उजनी धरणाचे पाणी अत्यंत विषारी असून, त्यापासून कर्करोगाला निमंत्रण मिळत आहे. दुर्दैवाने उजनीचेच पाणी इंदापूरकरांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. यामुळे खडकवासल्या कालव्यातून येणाऱ्या शहरालगत असलेल्या तरंगवाडी तलावातील पाणी नगरपरिषदेने इंदापूरकरांना पूर्वीप्रमाणे पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

उजनीच्या पाण्याबाबत समितीने नगरपरिषदेस निवेदन देण्यात आले. याबाबत बोलताना इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्रा.कृष्णा ताटे म्हणाले, की १९७२ च्या पूर्वीपासून इंदापूर शहराला तरंगवाडी तलावावरून पिण्याचे पाणी पुरवले जात होते. या ठिकाणाहून दोन पाणीपुरवठा योजना आहेत. मात्र, सन २०१८ सालापासून इंदापूर नगरपालिकेने तरंगवाडी तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद करून उजनी धरणातून नव्याने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या. उजनीचे पाणी दूषित असून, पिण्यास योग्य नाही. रसायन मिश्रित दूषित पाण्यामुळे जलचर प्राणी मृत पावलेले आहेत. हे पाणी माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही पिण्यास अयोग्य आहे. या पाण्यामुळे शहरात रोगराई पसरत असून, नागरिकांच्या कर्करोग पोटाच्या आजाराचे, तसेच मुतखड्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे इंदापूर शहरासाठी पूर्वीप्रमाणे असलेली तरंगवाडी तलावावरील पाणीपुरवठा योजना चालू करून पिण्यासाठी तेथील पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आली, आंदोलने केली आहेत. मात्र, नगरपरिषदेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे आता याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्रा.कृष्णा ताटे यांनी सांगितले.

यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, शिवाजी मखरे, धनंजय बाब्रस, हमीद आतार, माजी नगरसेवक शेखर पाटील, राजेश शिंदे, सलीम बागवान, फकीर पठाण यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शास्ती, थकीत कराबाबत चार तारखेपर्यंत निर्णय घ्या
राज्य सरकारने थकीत मालमत्ता कर व शास्तीच्या संदर्भात अभय योजना लागू केली आहे. राज्यातील अनेक नगरपालिकांनी या योजनेची अंमलबजावणी केली मात्र इंदापूर नगरपरिषदेकडून याबाबत विलंब होत आहे. यामुळे या अभय योजनेची इंदापूर नगर परिषदेने तत्काळ अंमलबजावणी करावी आणि नागरिकांची थकीत मालमत्ता कर आणि शास्तीमधून सुटका करावी. अन्यथा चार सप्टेंबरला तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच निर्णय होईपर्यंत नागरिकांवर वसुलीसाठी दबाव आणू नये.
- प्रा.कृष्णा ताटे, प्रमुख, इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती

06154

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com