शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी उघडा : सुळे

शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी उघडा : सुळे

Published on

इंदापूर, ता. ७ ‘‘शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी त्यांच्यासह बारा बलुतेदारांनाही केंद्र आणि राज्य सरकारने मदत करावी, यासाठी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी उघडली पाहिजे,’’ असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
खासदार सुळे या मंगळवारी (ता. ७) इंदापूर तालुका दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी तहसीलदार कार्यालय येथे बैठक घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, ॲड. तेजसिंह पाटील, ॲड. राहुल मखरे, कालिदास देवकर, अशोक घोगरे, अमोल भिसे, सागर मिसाळ, छाया पडसळकर, ॲड. आशुतोष भोसले, भीमराव भोसले, नितीन शिंदे, महादेव सोमवंशी आदी उपस्थित होते.
या बैठकी प्रसंगी ॲड. आशुतोष भोसले यांनी इंदापूर शहरातील पूर्वीच्या ग्रामीण रुग्णालयाची जागा
बळकावण्याचा प्रयत्न असून या प्रकरणी लक्ष घालावे, ॲड. राहुल मखरे यांनी इंदापूर शहराला खडकवासला कालव्यातून पिण्यासाठी पाणी मिळावे, प्रशासकीय भवनातील सुविधांबाबत माहिती दिली, अमोल भिसे यांनी तालुक्याच्या अनेक भागात झालेल्या नुकसानीचे अद्यापही पंचनामे न झाल्याचे निदर्शनास आणून दिले. सागर मिसाळ यांनी लाडक्या बहीण अनुदानाबाबत अडचणीसह अन्य नागरिकांनी आपापल्या भागातील समस्या प्रशासकीय अधिकारी व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडल्या.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधत सदर प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी इंदापूर न्यायालयातील बार रूमला भेट देत नवनियुक्त बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी वकील संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com