चंदनाच्या तस्करी प्रकरणी 
इंदापूर येथे एकावर गुन्हा

चंदनाच्या तस्करी प्रकरणी इंदापूर येथे एकावर गुन्हा

Published on

इंदापूर, ता. २१ ः हिंगणगाव (ता. इंदापूर) येथील पुणे- सोलापूर महामार्गावर दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला. या अपघातानंतर चारचाकी चालक वाहनासह पळून जात असताना टायर फुटला. यावेळी वाहनामध्ये चंदनाची तस्करी होत असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित वाहनचालकासह इतर साथीदारांच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात तब्बल सहा लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विशाल बळिराम गोडगे, पोलिस शिपाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (ता. २०) रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान हिंगणगाव हद्दीत पुणे- सोलापुर हायवेवर रमेश बाबूराव करडे (रा. कलानगर, दापोडी, पुणे) याने त्याच्याकडे चंदनाची झाडे तोडण्याचा परवाना नसताना चंदनाच्या झाडाची चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचे लहान- लहान तुकडे करून ते तीन पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये भरून त्याच्याकडील काळ्या रंगाच्या चारचाकी स्कॉर्पिओमध्ये (क्र. एमएच १४ एएम ७१८५) घेऊन जात होता. अपघातानंतर पोलिस पकडतील म्हणून सदरचे वाहन जागीच सोडून तो इतर साथीदारांसह पळून गेला.
यावेळी ८७ किलो वजनाचे चार लाख ३५ हजार रुपये किमतीचे तीन पांढरे रंगाचे पिशव्यांमध्ये असलेले चंदनाच्या लाकडाचे लहान- लहान
तुकडे, एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ, एक वन प्लस कंपनीचा मोबाईल असा एकूण सहा लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी रमेश करडे व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सलमान खान करत आहेत.

अपघातामुळे उघड झाली चंदनाची तस्करी
पळसदेव (ता. इंदापूर) येथील संजय तुकाराम काळे हे पत्नी संगीता संजय काळे यांच्यासह दुचाकीवरून (क्र. एमएच ४२ एएल २९७४) जात असताना पाठीमागून आलेल्या स्कॉर्पिओ मोटारीने (क्र. एमएच १४ एएम ७१८५) हिंगणगाव हद्दीत पुणे- सोलापूर हायवे रस्त्यावर बाभूळगाव पाटीजवळ पाठीमागून भरधाव वेगात येत जोरात धडक दिली. यामध्ये काळे पती- पत्नी गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक पुढे पळून गेले. त्यांनतर मोटारीचा टायर फुटल्याने मोटार हिंगणगाव पाटी येथे थांबवावी लागली. यामुळे सदर गाडीतील चंदन चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान अपघातात प्रकरणी ही गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com