इंदापुरातील २७ केंद्रांवर मतदार बजावणार हक्क

इंदापुरातील २७ केंद्रांवर मतदार बजावणार हक्क

Published on

इंदापूर, ता.२९ : इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात २७ मतदान केंद्रावर २४८२९ मतदार मतदान करण्यासाठी पात्र असणार आहेत. विशेष बाब म्हणजे यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुधाकर मागाडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली.
इंदापूर शहरांमध्ये २७ ठिकाणी मतदान केंद्र तयार केलेले असून, सर्व मतदान केंद्रावर नगरपरिषदेमार्फत सर्व व्यवस्था पुरविण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीकरीता व्हीलचेअरची सुविधा करण्यात आलेली आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आदर्श महिला मतदान केंद्र अंतर्गत शहरातील नारायणदास रामदास हायस्कूल येथील मुख्य इमारत दक्षिणाभिमुखी खोली क्र.१० मतदान केंद्र क्र. २/२ या केंद्रांवर सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
दरम्यान, एकूण १० प्रभागांमधील २० नगरसेवक निवडण्याकरता एकूण ५६ उमेदवार व नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. निवडणूक प्रक्रिया राबविणेकरिता सुमारे ३०० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून मतदान अधिकारी व कर्मचारी यांना १९ नोव्हेंबर व २४ नोव्हेंबर अशी दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे.

स्ट्रॉगरुममध्ये मतदान यंत्रे तयार
एकूण २६ मतदान केंद्रांवर मतदान साहित्य वाटप व स्वीकारण्याकरिता कालठण रोड इंदापूर येथील शासकीय धान्य गोडाऊन येथे केंद्र उभारण्यात आलेले आहे. येथे पोलिस ठाण्यामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. इंदापूर नगरपरिषद मार्फत २९ नोव्हेंबर रोजी रोजी राजकीय प्रतिनिधीच्या उपस्थित मध्ये मतदानाकरिता लागणारी मतदान यंत्रे (EVM मशिन) तयार करून स्ट्रॉगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

धान्य गोडाऊनमध्ये बुधवारी मतमोजणी
मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी (ता.०३) कालठण रोड इंदापूर येथील शासकीय धान्य गोडाऊन येथे होणार आहे. सदर मतदान मोजणी करिता एकूण ८५ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मतदान मोजणी केंद्रावर अधिकृत ओळखपत्र असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्या व्यतीरिक्त अन्य कोणासही प्रवेश देण्यात येणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
06719

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com