इंदापुरात २४ हजार ८२९ मतदार बजावणार हक्क
इंदापूर, ता. १ : इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि २० नगरसेवकपदांसाठी मंगळवारी (ता.२) शहरातील विविध २७ मतदान केंद्रावर मतदान होणार आहेत. २४ हजार ८२९ मतदार मतदान करण्यासाठी पात्र असणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुधाकर मागाडे व साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली.
सर्व मतदान केंद्रावर नगरपरिषद मार्फत सर्व व्यवस्था पुरविण्यात आलेल्या आहेत. यामध्ये एक नगराध्यक्ष तर एकूण १० प्रभागांमधील २० नगरसेवक निवडण्यासाठी मतदान पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी इंदापूर पोलिस ठाण्यामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तर मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी (ता. ३) कालठण रोड इंदापूर येथील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. मतदान मोजणी करिता एकूण ८५ अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दृष्टिक्षेपात
नगराध्यक्षपदासाठी उमेदवार : ५
नगरसेवकपदाच्या 20 जागांसाठी : ५६ उमेदवार
एकूण मतदार : २४ हजार ८२९
एकूण मतदान केंद्रे : २७
मतदान प्रक्रियेसाठी एकूण कर्मचारी : ३००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

