विनातारण कर्जाचा लाभ घेऊन यशस्वी व्हा

विनातारण कर्जाचा लाभ घेऊन यशस्वी व्हा

Published on

इंदापूर, ता. ३ : पूर्वी कोणत्याही बँकेत कर्ज घेण्यासाठी काहीतरी तारण ठेवावे लागायचे, लोकांना वेळेवर कर्ज मिळत नव्हते कर्जासाठी अनेक वेळा बँकेत हेलपाटे घालावे लागायचे; मात्र महिला स्वयंसहायता समूहाने बँकांचा इतका मोठा विश्वास निर्माण केलेला आहे की बँका आज त्यांना कोणतीही गोष्ट तारण न ठेवता कर्ज देतात. त्यामुळे भगिनींनो कर्ज घेणे ही संधी आहे आणि त्या संधीचा लाभ जास्तीत जास्त घ्या आणि यशस्वी व्हा, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.
इंदापूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहांना महाकर्जवाटप मेळावा निमित्त कृषिमंत्री भरणे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी तब्बल ७ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे, बँक ऑफ महाराष्ट्राचे महिलाल मीना, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक सचिन बाबर, बँक अधिकारी महेश शेळके, वैभव लाहोत, अमोल वाघमारे, शरद सूळ, रोहिदास राठोड, अशोक थोरात, जयदीप तोरणे, अशोक भिसे उपस्थित होते. यावेळी १६७ समूहांना एकूण ७ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.
कृषिमंत्री भरणे म्हणाले, ‘‘महिलांची दखल फक्त राज्यात नाही तर संपूर्ण जगाने घेतली आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेने २०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केले आहे. महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये चांगलं काम चालू आहे. महिला कोणताही समूह एनपीएमध्ये जाऊ देत नाहीत यामध्ये सीआरपीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे समूह व्यवस्थित चालू आहेत.’’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राणी ननवरे, आदित्य मांदळे, अमोल गलांडे, सुनीता दातखिळे, ज्ञानेश्वर राऊत,अमर कदम, निर्मला निमगिरे, चेतन रांजणकर, तेजस्विनी शिंदे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान भोरकडे यांनी केले.

गत वर्षांमध्ये तालुक्याला ३३ कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आत्तापर्यंत तालुक्याने ३१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले असून १०० टक्के उद्दिष्ट पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होईल. महिलांनी महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय उभा केलेले आहेत व त्या व्यवसायातून त्या महिला आता महिला उद्योजिका होत असल्याने येणाऱ्या काळात ‘लखपती दीदी’ मोठ्या उद्योजक होतील याचे समाधान आहे.
सचिन खुडे, गटविकास अधिकारी

6867

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com