इंदापूरच्या खेळाडूंचे धनुर्विद्या स्पर्धेत यश
इंदापूर, ता. १३ ः रांची (झारखंड) येथील ६९व्या शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत इंदापूरच्या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांचा या यशामध्ये महाराष्ट्राला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहे.
रांची (झारखंड) येथील अत्यंत थंड हवामान आणि प्रतिकूल परिस्थितीत सुरू असलेल्या ६९व्या शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धा २०२५- २६ मध्ये स्वरांजली बनसुडे, संस्कार खिलारे आणि सिद्धार्थ तिकोने यांनी चमकदार कामगिरी करत यश प्राप्त केले. या तिघांनाही शहरातील रोशन ॲकॅडमीचे जुबेर पठाण आणि फिरदौस पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. या तिन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महाराष्ट्र संघाच्या यशात निर्णायक योगदान दिले. त्यांच्या दमदार कामगिरीमुळे महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय पातळीवर चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली. या स्पर्धेत इंडियन राउंड प्रकारात खेळाडूंनी वैयक्तिक, तसेच सांघिक प्रकारात पदकांची लयलूट केली. यामध्ये इंडियन राउंड गटात खेळणाऱ्या स्वरांजली बनसुडे हिने भारतात प्रथम क्रमांक पटकावीत स्पर्धेची नायिका ठरली. तिने सलग सहा नॉकआऊट सामने जिंकत वैयक्तिक एलिमिनेशन प्रकारात सुवर्णपदक मिळवले. तिच्या खात्यात एकूण ओव्हरऑल सुवर्णपदक, वैयक्तिक एलिमिनेशन सुवर्णपदक, २० मीटर प्रकारात सुवर्णपदक, ३० मीटर प्रकारात रौप्य पदक, गर्ल्स टीम प्रकारात कांस्यपदक अशी पदके मिळवली. तसेच, मिक्स टीम प्रकारात संस्कार खिलारे सोबत खेळताना सामन्यावर वर्चस्व असतानाही समान गुणांमध्ये पराभव पत्करावा लागला.
तसेच, संस्कार खिलारे याने वैयक्तिक एलिमिनेशन प्रकारात सलग पाच सामने जिंकत थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्याला निसटता पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यासह रिकर्व प्रकारात खेळणाऱ्या सिद्धार्थ तिकोने याने सांघिक स्पर्धेत अप्रतिम खेळ करत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले.
06924
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

