इंदापुरात ४०० केंद्रांवर लोकशाहीचा उत्सव

इंदापुरात ४०० केंद्रांवर लोकशाहीचा उत्सव

Published on

इंदापूर, ता. ५ : इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून तयारी पूर्ण केली आहे. तालुक्यात ४०० मतदान केंद्रांवर ३ लाख २१ हजार २ मतदार मतदान करण्यासाठी पात्र असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे ८ गट आणि पंचायत समितीचे १६ गणांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यात ४०० ठिकाणी मतदान केंद्र तयार केले असून, सर्व मतदान केंद्रावर सर्व व्यवस्था पुरविण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीकरीता व्हीलचेअरची सुविधा केली आहे. तसेच गलांडवाडी नंबर एक येथे महिला मतदान केंद्राअंतर्गत सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेकर वस्ती वनगळी येथे आदर्श मतदान केंद्र, तर लुमेवाडी येथे परदानशील मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ४१ उमेदवार आणि पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ७२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सदर निवडणूक प्रक्रिया राबविण्याकरिता सुमारे २ हजार ४५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच, एकूण ४०० मतदान केंद्रांवर मतदान साहित्य वाटप, स्वीकारण्याकरिता कलठण रस्ता इंदापूर येथील शासकीय धान्य गोडाऊन येथे केंद्र उभारण्यात आले असून पोलिस ठाण्यामार्फत चोख बंदोबस्त ठेवला आहे.
मतमोजणी सोमवारी (ता. ९) कलठण रस्ता इंदापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे. मतदान मोजणी केंद्रावर अधिकृत ओळखपत्र असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त अन्य कोणासही प्रवेश देण्यात येणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.


दृष्टिक्षेपात
- एकूण जिल्हा परिषद सदस्य - ८
- जिल्हा परिषदेसाठी एकूण उमेदवार - ४१
- एकूण पंचायत समिती सदस्य - १६
- पंचायत समितीसाठी एकूण उमेदवार - ७२
- एकूण मतदार - ३ लाख २१ हजार २
- एकूण मतदान केंद्रे - ४००
- गुलाबी, आदर्श व परदानशील मतदान केंद्रे - ३
- एकूण नियुक्त कर्मचारी - २ हजार ४५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com