गोखळीतून तीन लाखांचा ऐवज लंपास
इंदापूर, ता. ५ : गोखळी (ता. इंदापूर) येथे चोरट्याने घरातील कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण दोन लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चोरीप्रकरणी विजय नाना वारे (वय ४२, व्यवसाय चालक, रा.गोखळी ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (ता. २) रात्री दोन ते तीन फेब्रुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गोखळी येथील फिर्यादी यांच्या राहत्या घरात चोरट्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतला व घरातील कपाट तोडले. त्यातील सोन्याचे गंठन, सोन्याची चैन, अष्टपैलू मणी, फिरकीचे स्टॅप्स, दोन पिळ्याच्या अंगठ्या, चांदीची वाटी, चांदीची पैंजण, चांदीच्या बांगड्या, सात हजार रुपये रोख तसेच एक मोबाईल फोन असा ऐवज चोरून नेल्याचे नमूद केले आहे.
फिर्यादीनुसार इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गोफणे करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इंदापूर शहरासह आसपासच्या परिसरात तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चोरी तसेच घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. पोलिस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

