इंदापुरात ‘यशस्वी पालकत्व’ कार्यशाळा
इंदापूर, ता. १६ ः येथे सहकार महर्षी श्रद्धेय स्व. शंकररावजी पाटील यांच्या १०२व्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थी सहाय्यक समिती, पुणे आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यशस्वी पालकत्व आणि उद्याचे तंत्रज्ञान’ या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले व सचिव डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आयोजित या शिबिराला इंदापूर शहर, तसेच परिसरातील पंचक्रोशीतून पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यशाळेस पुण्यातील मानसशास्त्रीय समुपदेशक डॉ. स्नेहल महेशकर आणि डॉ. स्मिता जोशी यांनी आजच्या धावपळीच्या युगात पालकांशी संवाद साधताना पौगंडावस्थेतील मुलांचे मानसशास्त्र, परीक्षेचे ताण- तणाव आणि मोबाईल- गॅजेट्सच्या वाढत्या व्यसनावर प्रकाश टाकला. पिढीतील अंतर कमी करून मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण करावे, याचे व्यावहारिक दाखले देऊन पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार रंजनकर यांनी, तर अरविंद गारटकर यांनी आभार मानले. यावेळी इंदापूर तालुक्यातील विविध शाळांमधील ज्या शिक्षकांनी आपल्या अध्यापनातून आणि शिस्तीतून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या गुरुजनांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अच्युतराव आपटे यांच्या माणसकन्या व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शशीताई भाटे, ट्रस्टचे खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर, आरोग्य केंद्र प्रमुख महादेव चव्हाण, कोपिवरची शाळा प्रमुख भारत बोराटे, हमीद आत्तार, दीपक जगताप आणि प्रकल्प अधिकारी सागर कांबळे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल राऊत, चारुशीला शिंदे, केदार गोसावी, त्रिशाला पाटील, रोहिणी जाधव आणि अथर्व सरवदे यांनी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

