इंदापूरच्या शहा ग्लोबल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात

इंदापूरच्या शहा ग्लोबल स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात

Published on

इंदापूर, ता. १८ : इंदापूरच्या शहा ग्लोबल स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शाळा परिसर भगव्या पताकांनी तसेच आकर्षक सजावटीने लक्ष वेधून घेत होता. यावेळी नगराध्यक्ष भरत शहा, शहा ग्लोबल स्कूलचे विश्‍वस्त मुकुंद शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा, अंगद शहा, रुचिरा शहा आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती देण्यात आली.
यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या कार्यक्रमात दुसरी, तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनी शिवाजी महाराज यांच्या जन्मावर पाळणा गीत सादर करून भक्तिभावाची रंगत वाढवली. पहिलीतील क्षितिज सांगवे या विद्यार्थ्याने जोशपूर्ण शिवगर्जना देऊन सर्वांमध्ये उत्साह निर्माण केला.
नर्सरी व के-वनच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य, प्राथमिक विभागातील तिसरीच्या विद्यार्थ्यांनी जोशपूर्ण पोवाडा सादर केला. शेवटी एकत्रित शिवगर्जनेने कार्यक्रमाची सांगता झाली. माधुरी देवकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com