इंदापूर नगरपरिषदेतर्फे महिला दिनाचे उपक्रम
इंदापूर, ता. ६ : इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिला बचत गटांना प्रोत्साहनपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ शनिवारी (ता. ७) नगराध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते होणार आहे.
शनिवारी सकाळी इंदापूर नगरपरिषद कार्यालय येथे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांची आरोग्य तपासणी, मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शनिवारी सायंकाळी ६ वाजता नगरपरिषदे शेजारील मराठी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कलांचे सादरीकरण होणार आहे. त्यापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र, इंदापूर यांच्या वतीने महिला बचत गटांना कर्ज वितरण करण्यात येणार आहे.
नगरपरिषदेसमोरील मैदानात सायंकाळी ५ वाजल्यापासून महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी स्टॉलची व्यवस्था केली आहे. खाद्यपदार्थ स्टॉल आणि इतर वस्तू विक्री करणाऱ्या महिलांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती माधुरी उंबरे, उपसभापती सुनीता नलवडे, पाणीपुरवठा समिती सभापती शुभम पवार, बांधकाम समिती सभापती दीप्ती राऊत, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती सुनील आरगडे, गटनेते शकील सय्यद, विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

