भारतीय मिलेट ही जगाला आरोग्यासाठी देणगी
इंदापूर, ता. १० ः ‘‘किंमतीला स्वस्त, गुणाला मस्त तसेच, शरीरातील विविध आजारांना नष्ट करणारी भरडधान्य ऊर्फ मिलेट हे संपूर्ण जगाला मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी वरदान आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी याचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे,’’ असे प्रतिपादन पुणे येथील डॉ. विकास ओझर्डेकर यांनी केले.
इंदापूर येथील आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठान आणि शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव डॉ. गिरीश देसाई, खजिनदार तुषार रंजनकर, विश्वस्त अरविंद गारटकर, आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदेश शहा, अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महिलांचे सौंदर्य आणि आरोग्य संवर्धन’, या विषयावर आयोजित व्याख्यान व मार्गदर्शन कार्यक्रमास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रतिष्ठानच्या संचालिका स्व. डॉ. राधिका संदेश शहा यांच्या पुण्यस्मृती निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अरविंद गारटकर व सेवानिवृत्त प्राचार्य भीमराव वणवे यांच्या हस्ते करण्यात आले. अकलूज येथील डॉ. संतोष काटकर यांनी महिलांच्या सौंदर्याचे संवर्धन करण्यासाठी भारतीय आयुर्वेद ही गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, मैत्रीण ग्रुपच्या उमा इंगुले, सकाळ तनिष्का तालुका समन्वयक सारिका पवार यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदेश शहा यांनी, तर सूत्रसंचालन श्रद्धा पवार यांनी केले.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव
यावेळी माजी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मैत्रीण ग्रुपच्या संस्थापिका अनुराधा गारटकर, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंदापूरच्या माजी अध्यक्षा डॉ. कल्पना खाडे, लिनेस क्लबच्या अध्यक्षा उज्ज्वला गायकवाड, महिला बचत गटासाठी कार्यरत असणाऱ्या निलोफर पठाण, सकाळ तनिष्काच्या तालुका समन्वयक सारिका पवार आणि अश्विनी गुजर यांचा समाजसेवी कार्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
07210
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

