ट्रकचे ब्रेक अचानक दाबल्याने इंदापुरात दोन मोटारींची धडक

ट्रकचे ब्रेक अचानक दाबल्याने 
इंदापुरात दोन मोटारींची धडक
Published on

इंदापूर, ता. ११ : सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर येथील बाह्यवळणावर ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या दोन मोटार एकमेकांना धडकल्या. या अपघातात दोन्ही मोटारींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सहा प्रवासी जखमी झाले.
सोलापूर बाजूकडून पुण्याकडे एक ट्रक भरधाव जात असताना इंदापूर शहराच्या बाह्यवळण मार्गावर गतिरोधकाजवळ ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्याच वेळी पाठीमागून मागून येणाऱ्या दोन मोटार चालकांना वाहनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे मोटारी एकमेकांवर धडकून अपघात झाला. धडकेची तीव्रता जास्त असल्याने दोन्ही मोटारींचे पुढील भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दोन्ही वाहनांमधील एकूण सहा प्रवासी जखमी झाले असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com