

इंदापूर, ता. २६ : इंदापूर शहरातील श्रीराम मंदिर, श्रीराम चौक येथे रामनवमी भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आठ दिवस विविध कार्यक्रम झाले. शुक्रवारी (ता. २७) महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे.
या निमित्ताने झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला इंदापूर शहर व पंचक्रोशीतील भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सप्ताहाची सुरुवात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झाली. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये दररोज पहाटे काकडा आरती, त्यानंतर पारायण, दुपारी भजन, सायंकाळी हरिपाठ व कीर्तन तर रामनवमी दिवशी उत्साहात धार्मिक कार्यक्रम झाले.
तर शुक्रवार रोजी सकाळी काल्याचे कीर्तन आणि नंतर या सप्ताहाचा समारोप महाप्रसादाने होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.