

इंदापूर, ता. १३ : थकीत ऊस बिले, वाहतूकदार आणि कामगारांचे वेतन तत्काळ अदा न केल्यास २० एप्रिल २०१६ रोजी कारखान्यासमोर तीव्र आंदोलन छेडणार आहे, असा इशारा रयत क्रांती संघटनेने दिला आहे. यासंदर्भात बिजवडी (ता.इंदापूर) येथे ‘ओंकार शुगर’च्या प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नीलेश देवकर यांच्या नेतृत्वाखाली कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना (सहयोग ओंकार शुगर युनिट ११, बिजवडी) येथे हे निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, एक जानेवारी २०२६ पासून गाळप झालेल्या उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. नियमानुसार १४ दिवसांत पेमेंट मिळणे बंधनकारक असताना कारखाना प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तसेच २०२५-२६ हंगामातील ऊस तोडणी, वाहतूक कंत्राटदारांची बिले आणि कामगारांचे अनेक महिन्यांचे वेतन प्रलंबित असल्याने संताप व्यक्त होत आहे.
यावेळी अभिमन्यू शिंदे, गुलाबराव फलफले, अमोल देवकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, ३१ जानेवारीपर्यंतची ऊस बिले १६ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जातील आणि ३० एप्रिलपर्यंत सर्व थकबाकी पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन कारखान्याचे व्यवस्थापक रणजित तावरे यांनी निवेदन स्वीकारताना दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.