इंदापुरात पावसाच्या हजेरीने व्यापाऱ्यांची धावपळ

इंदापुरात पावसाच्या हजेरीने 
व्यापाऱ्यांची धावपळ
Published on

इंदापूर, ता. १९ ः दिवसभर उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या इंदापूरकरांना संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने गारवा अनुभवायला मिळाला. मात्र, त्याचवेळी रविवार हा आठवडे बाजाराचा दिवस असल्याने व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
ऐन उन्हाळ्यात एप्रिलच्या मध्यावर शहरात अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या इंदापूरकरांना थोडा दिलासा मिळाला असून वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. दरम्यान, रविवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने संध्याकाळी बाजार आटोपत असलेल्या व्यापाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसापासून माल सुरक्षित ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना धावपळ करावी लागली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com