जेजुरीत ‘एक सही संतापाची’ मोहिमेला प्रतिसाद

जेजुरीत ‘एक सही संतापाची’ मोहिमेला प्रतिसाद

Published on

जेजुरीत ‘एक सही संतापाची’ मोहिमेला प्रतिसाद
मनसेचा उपक्रम : तीन दिवसांत सुमारे ४,५००हून अधिक मतदारांच्या जाहीर स्वाक्षऱ्या
जेजुरी, ता.१० : सध्याच्या राजकीय स्थितीसंदर्भात मनसेच्यावतीने महाराष्ट्रभर ‘एक सही संतापाची’ ही मोहीम राज्यभर सुरू आहे. जेजुरीतही मनसेचे तालुकाध्यक्ष उमेश जगताप
यांनी राबविलेल्या या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
याबाबत जगताप म्हणाले, ‘‘महाराष्ट्रामध्ये तत्त्व, विचार, निष्ठा यांना मूठमाती देऊन स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी आणि स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी, सत्ता भोगण्यासाठी युत्या होत आहेत. यामध्ये मतदारांचा विचार केला जात नाही. सोयीसाठी युती, आघाडी केली जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. हा संताप व्यक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.’’
सध्याच्या राजकीय घडामोडींवर सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार ‘एक सही संतापाची’ ही मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यामधील सासवड, जेजुरी या ठिकाणी तीन दिवसांत सुमारे ४,५००हून अधिक मतदारांनी जाहीर स्वाक्षऱ्या करून राज ठाकरे यांच्या मोहिमेला प्रतिसाद दिला असल्याचेही तालुकाध्यक्ष जगताप यांनी सांगितले.
या उपक्रमात मनसेचे शंकर गावडे, अविनाश बारभाई, मोहन जगताप, किरण रोमन, विक्रम जगताप, मयूर जाधव, रोहन जगताप आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जेजुरी (ता. पुरंदर) : ‘एक सही संतापाची’ मोहीम राबविताना मनसे तालुकाध्यक्ष उमेश जगताप व इतर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.