जेजुरीत महिलांकडून सामुदायिक हरिद्रामार्चन महापूजा

जेजुरीत महिलांकडून सामुदायिक हरिद्रामार्चन महापूजा
Published on

जेजुरी, ता. ३ : श्री मार्तंड देवस्थान जेजुरी व श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्यावतीने चंपाषष्ठी षडरात्र महोत्सवानिमित्त महिलांच्या हस्ते श्री म्हाळसाकांत हरिद्रामार्चन महापूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी सुमारे ५५१ महिलांना या कार्यक्रमात भाग घेतला. श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा सौ मनीषा खेडेकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या कार्यक्रमात जवळपास ५५१ महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
या उपक्रमासाठी लिंबराज महाराज देवस्थान, जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान, अखिल मंडई गणपती मंडळ, दिव्यांग प्रतिष्ठान, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, बालेवाडी यांनी सहकार्य केले.
यासाठी रचना झांजले, स्मिता वाघ, डॉ. भार्गवी बडे, कविता खेडेकर, ज्योती ढमाळ, प्रियांका निकम, संगीता निंबाळकर, मनीषा वांजळे यांनी प्रयत्न केले. सर्व महिलांची मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने ओटी भरण्यात आली. शशिकांत व मिलिंद सेवेकरी काका यांनी पौराहित्य केले.
माजी नगराध्यक्षा साधना दीडभाई, अमृता घोणे, सुरेखा सोनवणे तसेच माजी आमदार संजय जगताप यांच्या पत्नी राजवर्धिनी जगताप यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मनीषा खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. ज्योती घाटे यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा थोरवे यांनी आभार व्यक्त केले.
सुधाकर मोरे यांनी वाद्य सेवा दिली. यावेळी येळकोट येळकोट जयमल्हार च्या जयघोषात सगळा परिसर दुमदुमून गेला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती याठिकाणी दरवर्षी ऋषीपंचमीला महिलांचे अथर्वशीर्ष पठण होते, तसेच नवरात्रीमध्ये देवीची कुंकू मार्जन पूजा होते. या दोन्ही उपक्रमांच्या अनुषंगाने खंडेरायाच्या दारातही महिलांकडून महाआरती हरिद्रामार्चन पूजा व्हावी, या दृष्टिकोनातून हा संकल्प प्रथमच घेण्यात आला आणि यासाठी देवसंस्थान, ग्रामस्थ व इतर सर्व सेवाभावी संस्थांनी साथ दिल्याचे आयोजिका मनीषा खेडेकर यांनी सांगितले. यावेळी जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग क्षेत्रात सेवाभावे काम करत असलेल्या अनिकेत सेवा भावी संस्था, ब्रम्हदत्त विद्यालय, कलावैभव सेवाभावी संस्था, जीवन साधना फाउंडेशन, मळगंगा अंध अपंग सेवा संस्था व जीवनधारा विद्यालय या सहा संस्थांना खंडेरायाच्या चंपाषष्टी षडरात्रीचे औचित्य साधून विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर व ॲड. पांडुरंग थोरवे यांचे व उपस्थित महिलांच्या हस्ते सन्मानित केले. दिव्यांग क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करत असलेले सिने व नाट्य बालकलाकार श्रीश व दर्श खेडेकर यांच्या प्रयत्नातून दिव्यांग मुलांना सहल आणि खंडेरायाच्या दर्शनाची सोय करून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com