वाल्ह्यात जुन्या वादातून 
दोघांवर कोयत्याने हल्ला

वाल्ह्यात जुन्या वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला

Published on

जेजुरी, ता. ४ : वाल्हे (ता. पुरंदर) येथे जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी गणेश जगन्नाथ भुजबळ (रा. वरचा मळा, वाल्हे) याने दोघांवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी आरोपीस अटक करून सासवड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांनी माहिती दिली की, रामचंद्र पांडुरंग भुजबळ (रा. वरचा मळा, वाल्हे) यांनी त्यांच्या मळ्यात जाण्यासाठी रस्ता मंजूर करून घेतल्याचा राग मनात धरून आरोपी गणेश भुजबळ याने याच पाणंद रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा लावून रामचंद्र भुजबळ यांचा रस्ता अडवला. तुला आता जिवंत सोडणार नाही, असे म्हणत जिवे मारण्याच्या उद्देशाने हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करण्यास सुरवात केली. यावेळी तेथे उपस्थित असलेले ओंकार अरविंद पवार (रा. आडाची वाडी, वाल्हे)
हे भांडण सोडवण्यास गेले असता त्यांच्यावरही कोयत्याने वार केले. त्याच बरोबर रामचंद्र भुजबळ यांचा मुलगा श्रेयस याने वडिलांना वाचवण्यासाठी आरोपी गणेश याला दगड मारल्याने त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात रामचंद्र भुजबळ आणि ओंकार पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी ओंकार पवार यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
जेजुरी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पुढील तपास जेजुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एल. एन. तारडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com