पुणे
जेजुरीतील ज्येष्ठ नागरिक संघटनेला मदत
जेजुरी, ता. २६ ः जेजुरी येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या इमारतीच्या जिर्णोध्दारासाठी नगरपालिकेचे माजी मुख्याधिकारी कै. बाळकृष्ण सखाराम पेशवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दीड लाख रुपयांचा निधी देण्यात आला. बाळासाहेब पेशवे हे नगरपरिषदेमध्ये ३८ वर्षे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी पालिकेत अनेक उपक्रम राबविले. पेशवे यांच्या कन्या मीना कुलकर्णी, अलका फौजदार यांच्याकडून हा निधी संघटनेचे अध्यक्ष शामकाका पेशवे यांनी स्विकारला. यावेळी उपाध्यक्षा उषा आगलावे, सुहास बारभाई, माणिक पवार, विलास घोणे, सयाजी मोहरकर, भाजप जेजुरी शहर मंडल अध्यक्ष सचिन पेशवे आदी उपस्थित होते. ‘‘पेशवे यांच्या कुटुंबियांनी दिलेली मदत मोलाची असून संघटनेच्या इमारत दुरुस्तीसाठी ती वापरली जाईल,’’ असे संघटनेचे अध्यक्ष शामकाका पेशवे यांनी यावेळी सांगितले.