जेजुरीत हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन, मेळावा
जेजुरी, ता. १० : व्हीजन सखी महिला बचत गटाच्या वतीने महिलांच्या उद्योग आणि व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या कौशल्याला संधी देवून सबलीकरणासाठी शनिवारी (ता. ११)हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन आणि आनंद मेळावा घेण्यात येणार असल्याचे व्हीजन सखी ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले.
दीपावलीनिमित्त महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे आणि आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे. जानुबाई मंदिराच्या पाठीमागील सागर हॉलमध्ये सकाळी नऊ ते रात्री दहा यावेळेत हे प्रदर्शन होणार आहेत. जेजुरी शहरात प्रथमच आयोजित केलेल्या या मेळाव्यात महिला बचत गट, घरगुती आणि लघु उद्योगातून तयार केलेल्या वस्तू, कपडे, लोणची पापड, दिवाळीनिमित्त गृहसजावटीच्या वस्तू,
दिवाळी फराळ, तसेच लहान मुलांसाठी विविध खेळणी असे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याचे आयोजन दीपा खुडे, अर्चना क्षीरसागर, श्वेता कटफळकार, वनिता बयास, साधना दीडभाई, सीमा पवार आदींनी केले आहे.