बारामतीप्रमाणे जेजुरीचा विकास करू

बारामतीप्रमाणे जेजुरीचा विकास करू

Published on

जेजुरी, ता. २७ : ‘‘वाढत्या नागरिकरणाच्या समस्या सोडविण्यासाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व असायला पाहिजे. बारामतीप्रमाणे जेजुरीचा सर्वांगिण विकास साधायचा असल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचाराचे नेतृत्व पालिकेत असले पाहिजे,’’ अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची जाहीर सभा जेजुरीत झाली. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी जेजुरीच्या अनेक समस्यांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘‘जेजुरीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न, रोपवे, हद्दवाढ, औद्योगिकरणाचे प्रश्न, भाविकांचे प्रश्न आदी सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. मला बारामतीवरून पुण्याला जाण्यासाठी जेजुरीवरून जावे लागते. त्यामुळे जेजुरीचे प्रश्न नाही सुटले तर मला तुम्ही जाब विचारू शकता. पुरंदर तालुका उद्याच्या काळात वेगाने बदलेला दिसेल. विमानतळ, रिंगरोड, मेट्रो, आयटी पार्कमुळे पुरंदरची वेगळी ओळख तयार होईल. त्यासाठी तशा सुविधा सासवड व जेजुरी परिसरात निर्माण झाल्या पाहिजेत. त्यासाठी सक्षम नेतृत्व तयार झाले पाहिजे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई व त्यांचे सहकारी हे आवाहन स्वीकारतील, अशी मला खात्री
आहे.’’
‘‘जेजुरीत नागरी सुविधा पुरविण्यासाठी मागील सत्ताधारी कमी पडले. त्यामुळे जेजुरीकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जेजुरीचा विकास अजित पवार हेच चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे जेजुरीकरांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ द्यावी,’’ असे आवाहन नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी केले.

जेजुरी (ता. पुरदंर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com