जेजुरीत प्रचारातील गाण्यांतून जुगलबंदी

जेजुरीत प्रचारातील गाण्यांतून जुगलबंदी

Published on

जेजुरी, ता. २८ : जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रचारसभा, पदयात्रा व मतदारांच्या गाठीभेटीमुळे रंगत वाढत आहे. फिरत्या वाहनांवरील
गाण्यांच्या चालीवरील प्रचार नागरीकांचे लक्ष वेधून घेत आहे.
जेजुरीत नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयदीप बारभाई, भाजपचे सचिन सोनवणे व शिवसेनेचे विठ्ठल सोनवणे हे उमेदवार आहेत. तिन्ही उमेदवारांच्या फिरत्या गाडीवरील गाण्यावरील प्रचार चांगलाच रंगला आहे. विकासाच्या मुद्याभोवती गाण्यांची जुगलबंदी सध्या सर्वत्र सुरु आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी अजित पवार यांची जाहीर सभा झाली. तर भाजपच्या उमेदवारीसाठी शनिवारी सभा होणार आहे. शिवसेनेचे उमेदवार सोनवणे यांनी शहरभर प्रचार चालविला आहे. नगरसेवकपदाचे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. काही उमेदवार मोबाइलच्या मॅसेजचा उपयोग करून मतदारांशी संपर्क साधत आहेत. महिलांच्या प्रचारात हळदीकुंकवाचे कार्यक्रम रंग भरत आहेत. प्रचारातील महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. पदयात्रा व घरभेटीवर उमेदवार व कार्यकर्ते दिवसभर नियोजन करित आहेत. बाहेरगावी असणाऱ्या मतदारांशी संपर्क साधताना उमेदवारांची दमछाक होत आहे. जुनी जेजुरी ते लवथळेश्वर व रेल्वे स्टेशन ते कडेपठार पायथा एवढा परिसरात सध्या प्रचाराच्या गाड्या आलटून पालटून येर झाऱ्या घालत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com