जेजुरीच्या विकासासाठी भाजपचे नेतृत्व सक्षम
जेजुरी, ता. २९ : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राचा विकास केला आहे. जेजुरी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. जेजुरीचा विकास भाजपचे नेतृत्व सक्षमपणे करू शकते. जेजुरी शहराला देखणे रुप द्यायचे आहे. त्यामुळे जेजुरी पालिकेच्या चाव्या सेवाभावी वृत्तीनेन व दूरदृष्टीने काम करणाऱ्या नेतृत्वाकडे द्या,’’ असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
जेजुरी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या प्रचारसभेत चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, ‘‘तीर्थक्षेत्रे हे पर्यटन केंद्र बनले पाहिजेत. त्यातून तरुणांना रोजगाराची संधी मिळते. वाराणसी, अयोध्येप्रमाणे आपली जेजुरी विकसित झाली पाहिजे. त्यासाठी पालिकेच्या चाव्या योग्य माणसाच्या हातात द्या. सचिन सोनवणे यांच्यासमोर जेजुरीचा विकास करण्याचा आराखडा तयार आहे. त्यांनी पाच वर्षात चांगला विकास करून दाखविला. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना साथ द्या.’’
यावेळी माजी आमदार संजय जगताप म्हणाले, ‘‘भ्रष्टाचार करणारीच मंडळी जेजुरी भ्रष्टाचारमुक्त करायचे सांगतात. यांना पंचवीस वर्षात जे जमले नाही, ते आम्ही पाच वर्षात करून दाखविले. जेजुरीत झालेली कामे दुरदृष्टीचा विकास कसा असतो, हे सांगतात. जेजुरीत झालेली नीरा नदीवरील पाणीयोजना कधीच नीट चालली नाही. या योजनेच्या कामातच मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे जेजुरीकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उद्याच्या काळात नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी सचिन सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभे रहा.’’
नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सोनवणे यांनी पाच वर्षात केलेल्या कामाची यादी वाचून दाखविली. यावेळी आमदार योगेश टिळेकर, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार अशोक टेकवडे, गंगाराम जगदाळे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

