जेजुरीत ७८ टक्के मतदारांनी बजावला हक्क

जेजुरीत ७८ टक्के मतदारांनी बजावला हक्क

Published on

जेजुरी, ता. २ : जेजुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी वीस केंद्रांवर ७८.०६ टक्के मतदान झाले. शांततेत मतदानाची परंपरा मतदारांनी चालू ठेवली. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मताची टक्केवारी कमी झाली. एकूण १२३३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जेजुरीत दहा प्रभागांत वीस केंद्रावर शांततेत मतदान झाले. नगराध्यक्षदासाठी तीन, तर नगरसेवकपदासाठी ५० उमेदवार रिंगणात होते. एकूण १५८०० मतदार आहेत. त्यापैकी १२३३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुष ७५८३ मतदारापैकी ५८९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर ८२१५ महिला मतदारांपैकी ६४३६ महिलांनी मतदानाची हक्क बजावला. तृतीयपंथी दोन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.एकूण ७८.०६ टक्के मतदान झाले. प्रभाग २मधील १मध्ये शासकीय तांत्रिक विद्यालयात सर्वात जास्त ८४.०५ टक्के मतदान नोंदले गेले.
नगराध्यक्षपदासाठी तिरंगी, तर नगरसेवक पदासाठी काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी व चौरंगी लढत होती. मागील निवडणुकीत ८६ टक्के मतदान होते. यावेळच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली. मयत अथवा बाहेरगावच्या मतदारांची अनुपस्थिमुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे बोलले जात होते. दुपारनंतर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी मतदान वेळ संपेपर्यंत रांगा लावून मतदान मतदान करित होते. निवडणूक निरीक्षक आरती भोसले व वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांनी केंद्रांना भेटी दिल्या. शांततेत मतदानाची परंपरा जेजुरीकरांनी यावेळी कायम ठेवली.
मतदारांना प्रभावित करण्यासाठी ‘अर्थ’ कारण झाल्याचे चर्चा अनेक ठिकाणी सुरु होती. भाव ठरवून मतदारांना आकर्षित गेले जात होते.
त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com