जेजुरीतील हवालदारावर लाच मागितल्याचा गुन्हा

जेजुरीतील हवालदारावर 
लाच मागितल्याचा गुन्हा
Published on

जेजुरी, ता. १८ : जामीनपात्र वॉरंट रद्द करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जेजुरी (ता. पुरंदर) पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस हवालदारासह एका खासगी व्यक्तीवर बुधवारी (ता. १७) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.
याबाबत एका ५९ वर्षीय कापड व्यावसायिकाने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या मुलाने सन २०१९ मध्ये एका व्यक्तीविरोधात जेजुरी पोलिस ठाण्यात सावकारकी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांची पत्नी हे साक्षीदार होते. दरम्यान, या दोघांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट (गेट वॉरंट) निघाले होते. ते रद्द करून देण्यासाठी पोलीस हवालदार दशरथ शिवाजी बनसोडे (वय ५७) आणि सचिन अरविंद चव्हाण (रा. वाल्हे, ता. पुरंदर) यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता पोलीस हवालदार बनसोडे यांनी लाचेची मागणी केल्याचे, तसेच सचिन चव्हाण याने लाच देण्यासाठी तक्रारदारास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे करत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Three Cops Booked After Accepting ₹7,000 Bribe to Process Accident FIR
anti corruption buro, solapur
Jalgaon
ACB Trap: Gram Sevak and Clerk Arrested for Bribery in Balapur Taluka
Marathi News Esakal
www.esakal.com