जेजुरी गडावर पुष्पवृष्टी

जेजुरी गडावर पुष्पवृष्टी
Published on

जेजुरी, ता. १९ ः जेजुरी (ता. पुरंदर) येथे श्री खंडोबा गडावरील समूह शिल्पातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पावर विधिवत पूजन करून पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय व ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’ या जयघोषाने जेजुरी गड परिसर दुमदुमून गेला. देवस्थानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त मुख्य गाभाऱ्यात, समूहशिल्प स्थळी, तसेच मंदिर गडकोटामध्ये भव्य अश्वारूढ पुतळा ठेवून फुलांची आकर्षक सजावट केली होती.
यावेळी शिवयोद्धा मर्दानी आखाडा, सांगवी (पुणे) यांच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके गडकोट परिसरात सादर करण्यात आले. कार्यक्रमास देवस्थान प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, ॲड. विश्वास पानसे, अनिल सौंदडे, ॲड. पांडुरंग थोरवे, पोपटराव खोमणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे
अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, नगराध्यक्ष जयदीप बारभाई, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, नगरसेवक शिवाजी जगताप, अजिंक्य देशमुख, रोहित खोमणे, स्वप्नील हरपळे, गणेश डोंबे, परशुराम लाखे, नगरसेविका नीलम सातभाई, मोनिका घाडगे, भक्ती कोरफड, प्रज्ञा राऊत, मेघा उबाळे, स्नेहल भालेराव, स्वरूपा खोमणे, योगिता दोडके, मंदा बयास, माजी विश्वस्त संदीप जगताप, शिवसेना जेजुरी शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे, सुरेश उबाळे, अभिनेते श्रीश खेडेकर, वर्षा थोरवे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com