जयाद्री डोंगरातील वन्यप्राणी, पक्षांना दिलासा

जयाद्री डोंगरातील वन्यप्राणी, पक्षांना दिलासा
Published on

जेजुरी, ता. ६ ः जेजुरी (ता. पुरंदर) येथील जय मल्हार फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यामध्ये जेजुरी परिसरातील जयाद्रीच्या डोंगरातील वन्य पशू- पक्षांसाठी वनविभागाने तयार केलेल्या पाणवठ्यांमध्ये टॅंकरने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. लोकसहभागातून खर्च करून कोरडे पाणवठे पाण्याने भरले जात आहे. तसेच, पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या पक्षांसाठी धान्याचीही सोय केली आहे.
वनविभाग व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाणवठ्यावर पाणी सोडण्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी वनविभागाने फाउंडेशनला नवीन तलाव बांधून देण्याची विनंती केली. फाउंडेशनच्यावतीने चार तलाव बांधून देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रमेश बयास, उद्योजक बाळासाहेब दरेकर, उद्योजक दत्तात्रेय गावडे, सचिन कुंभार यांनी तलाव तयार करण्यासाठी लागणारा खर्च देण्याचे जाहीर केले.
पाणवठ्यावर कोण कोणते प्राणी पाणी पिण्यासाठी येतात? हे पाहण्यासाठी, नाईट व्हिजन ट्रॅप कॅमेरा देण्याचे आश्वासन देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी दिले. या उपक्रमास दरवर्षी प्रमाणे सचिन कुंभार व तुषार कुंभार यांनी पाण्यासाठी पहिला टॅंकर दिला. या टॅंकरचे पाणी पाणवठ्यात सोडण्यात आले.
यावेळी मुख्य विश्वस्त मंगेश घोणे,रमेश बयास,बाळासाहेब दरेकर,भाजपा शहर अध्यक्ष सचिन पेशवे, नगरसेवक रोहित खोमणे,गोरख कुंभार,तुषार कुंभार,सचिन कुंभार,आनद भांडवलकर, सतीश पवार, यश कुंभार, धनंजय केळकर, विजय हरिष्चंद्रे, नितीन राऊत आदी उपस्थित होते.
दरवर्षी मार्च महिन्यात वन्यप्राण्यांचे पाणवठे भरण्यासाठी फाउंडेशनकडून प्रयत्न केले जातात. यंदा कडक उन्हाळा लवकर सुरू झाल्याने ६ मार्चपासून पाणवठे पाण्याने भरून ठेवणे व पक्ष्यांसाठी धान्याची सोय करणे आदी कामे सुरू केली आहेत. हे काम पावसाळा सुरू होईपर्यंत निरंतर सुरू राहिल, असे फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल बारभाई यांनी सांगितले.

03677

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com