पद्मावती एज्युकेशन सोसायटीला आदर्श संस्था पुरस्कार प्रदान

पद्मावती एज्युकेशन सोसायटीला 
आदर्श संस्था पुरस्कार प्रदान
Published on

जेजुरी, ता. १० ः शिवशंभो प्रतिष्ठानच्यावतीने राख (ता. पुरंदर) येथील पद्मावती एज्युकेशन सोसायटीला आदर्श शैक्षणिक संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. दुर्गम भागातील शैक्षणिक संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याने प्रतिष्ठानने संस्थेच्या कामाची दखल घेत पुरस्कार प्रदान केला.
हिंदवी स्वराज्याचे तोरण महोत्सव आयोजित शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शैक्षणिक संस्था पुरस्कार यावर्षी पुरंदर तालुक्यातील डोंगरी भागात शैक्षणिक काम करणाऱ्या पद्मावती एज्युकेशन सोसायटीला प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानचा हा चौथा राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सरसेनापती येसाजी कंक यांचे १३वे वंशज संजय कंक, शेलार मामांचे वंशज राहुल शेलार, नागपूर गादीचे वंशज सचिन राजेभोसले, संत तुकाराम महाराजांचे वंशज अनिकेत महाराज मोरे, शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव पवार यांच्या हस्ते प्रदान केला.
यावेळी श्री पद्मावती एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे सचिव श्रीकांत पवार, कोषाध्यक्ष शशिकांत पवार, संचालक सुशांत पवार, गणेश पवार, अभिजित पवार, नामदेव रणवरे, अतुल पवार, यशवंत पवार, युवा उद्योजक जालिंदर पवार, नृत्य दिग्दर्शक प्रदीप खेडेकर आदींनी पुरस्कार स्विकारला.

03685

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com