श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तपदी ॲड. पानसे

श्री मार्तंड देवसंस्थानच्या 
विश्वस्तपदी ॲड. पानसे
Published on

जेजुरी, ता. २३ : श्री मार्तंड देवसंस्थान न्यासाच्या प्रमुख विश्वस्तपदी (अध्यक्ष) ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विश्वास गोविंद पानसे यांची एकमताने निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष मंगेश घोणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती झाली आहे. सासवड बार कौन्सिलचे माजी सचिव असलेले ॲड. पानसे यांनी कायदा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, ते विविध सामाजिक व राजकीय उपक्रमांत सक्रिय असतात. निवडीनंतर देवसंस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, पुजारी, खांदेकरी, मानकरी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवसंस्थानच्या नियोजित योजना पूर्णत्वास नेण्यासह भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ॲड. पानसे यांनी यावेळी सांगितले.

03751

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com