
शिवशक्ती पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
जुन्नर, ता. २० : उत्तर पुणे जिल्ह्यातील दिवंगत कॅप्टन अॕड भाईसाहेब पुरवंत यांनी स्थापन केलेल्या जुन्नर येथील शिवशक्ती नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी दिली.
पतसंस्थेच्या स्थापनेपासून गेल्या ३३ वर्षांपासून निवडणूका बिनविरोध पार पडल्या आहेत. संचालक मंडळाच्या पहिल्या सभेत अध्यक्षपदी ऊर्मिला विलास पुरवंत व उपाध्यक्षपदी डॉ. अजित सुधाकर वल्हवणकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी खजिनदारपदी पंकज श्याम रासने, सेक्रेटरीपदी अॕड. समीर बाळासाहेब पुरवंत यांची निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून मयूर विजय संगमनेरकर, रत्नाकर महादेव आवटे, राजेंद्र चिमणलाल कोठारी, अब्दुल समद सल्लाउद्दीन इनामदार, प्रमोद लक्ष्मण कवडे, राजेश शशिकांत ढोबळे, बंडू सदाशिव कर्पे, चेतन सुमतीलाल शहा, भावना संजय खत्री, विकास विठ्ठल घोणे यांची तसेच तज्ञ संचालक म्हणून डॉ. जे. आर. मुल्ला व स्वाती अनिरुद्ध साखरे यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेचे कार्यलक्षी संचालकपदी दीपक गजानन खत्री यांची निवड करण्यात आली. मुख्य शाखेच्या व्यवस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कल्पना सुनील यंदे यांची निवड झाली .
पतसंस्थेच्या जुन्नर येथील दोन व चाकण येथील एक अशा तीन शाखा असून त्या स्वमालकीच्या जागेत कार्यरत आहेत. पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडल्याबद्दल सभासदांनी समाधान व्यक्त केले.