जुन्नर तालुक्यातील दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर तालुक्यातील दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप
जुन्नर तालुक्यातील दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप

जुन्नर तालुक्यातील दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप

sakal_logo
By

जुन्नर, ता. २८ : जुन्नर तालुक्यातील दिव्यांगांना रूचिका क्लब मुंबई व संपर्क संस्था भगवान महावीर विकलांग सहायता समितीकडून मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले.
यात २६ तीन चाकी सायकल, २८ व्हीलचेअर, ६७ कानाची मशिन, ५४ जणांना चष्मा तसेच कुबड्या, काठी, वॉकर, कृत्रीम पाय, कॅलिपर बूट आदी साहित्याचा समावेश आहे.
येथील प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राकडे दिव्यांग साधनांसाठी जुन्नर तालुक्यातील २३५ दिव्यांगांनी नोंदणी केली होती. त्यांना भाजे-मळवली (ता.मावळ) येथे साहित्य वाटप करण्यात आले. याचबरोबर लोणावळा सहलीचे आयोजन केल्याचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी रूचिका क्लब, मुंबई व संपर्क संस्था सहायता समितीचे विश्वस्त किरण आर्या, अमितकुमार बॅनर्जी, डॉ. सचिन गिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुज सिंग, भगवान महावीर विकलांग सहायताचे नारायण व्यास, पुणे जिल्हा परिषदेचे दिव्यांग कक्ष अधिकारी संभाजी भांगरे, प्रहार रूग्णसेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे तालुका अध्यक्ष अरुण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, सुनील जंगम, सौरभ मातेले, श्रीहरी नायकोडी, केरभाऊ नायकोडी व प्रहार रूग्णसेवक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
बॅनर्जी यांनी प्रास्ताविक केले, अनुज सिंग यांनी आभार मानले. प्रदिप वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. जुन्नर पंचायत समितीच्या समग्र शिक्षा अभियानाचे विशेष शिक्षक संगीता डोंगरे, रोहिणी गडदे, सीमा मोरे, जयश्री मुंढे व शिवाजी मोहीते, योगेंद्र कुलकर्णी, सतीश माळी यांनी सहकार्य केले.