जुन्नरला उद्यापासून धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला उद्यापासून
धार्मिक कार्यक्रम
जुन्नरला उद्यापासून धार्मिक कार्यक्रम

जुन्नरला उद्यापासून धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

जुन्नर, ता. ९ : श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांचा १४५ वा प्रगट दिन सोहळा जुन्नर येथील श्री क्रांती गणेश मंदिर, सराई पेठ येथे साजरा होत आहे.
यानिमित्ताने शनिवारी (ता. ११) व रविवारी दररोज दुपारी ३ ते ६ आणि सोमवारी संध्याकाळी ४ ते ६ वेळेत श्री संत गजानन महाराज यांचे श्री विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण करणार आहे. सोमवारी सकाळी ‘श्रीं’च्या मूर्तीस अभिषेक व आरती होईल. दुपारी शिंदे-राळेगण येथील भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी श्री स्वामी समर्थ केंद्र कुसूर येथील श्री तुकाराम महाराज दुराफे यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक, नंतर महाआरती व महाप्रसाद आहे. रात्री १० वाजता जागर होईल.