Thur, March 23, 2023

चिंचेच्या झाडावरून
शिंदे गावात भांडणे
चिंचेच्या झाडावरून शिंदे गावात भांडणे
Published on : 23 February 2023, 9:42 am
जुन्नर, ता. २३ : शिंदे (ता. जुन्नर) येथे शेताच्या बांधावरील चिंचेच्या झाडावरील चिंच उतरविण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून जुन्नर पोलिसांनी श्याम तुकाराम वाघमारे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद शोभा किसन वाघमारे यांनी दिली की, त्यांचे पती नामदेव हे चिंच उतरवत असताना आरोपी श्याम याने, ‘तुम्ही कोणाला सांगून चिंच उतरवता?’ असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना समजताच तेथे आलेल्या फिर्यादी शोभा यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार काळे हे पुढील तपास करत आहेत.