माणिकडोहच्या ढोबळे दांपत्यास राज्य पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणिकडोहच्या ढोबळे दांपत्यास राज्य पुरस्कार
माणिकडोहच्या ढोबळे दांपत्यास राज्य पुरस्कार

माणिकडोहच्या ढोबळे दांपत्यास राज्य पुरस्कार

sakal_logo
By

जुन्नर, ता. २७ : माणिकडोह (ता. जुन्नर) येथील कल्पना व उल्हास किसन ढोबळे दांपत्यास यावर्षीचा शिवाजी ट्रेल संचलित मधू-मंगल संस्कृती जतन राज्य पुरस्कार मिळाला आहे.

समितीचे संस्थापक मिलिंद क्षीरसागर व अध्यक्ष धनंजय देशपांडे यांनी निवड समितीच्यावतीने हडसर येथील दुर्गपूजेप्रसंगीं हा पुरस्कार जाहीर केला.

दुर्ग संवर्धनाची कार्य करणाऱ्या मावळ्यांच्या आईवडलांचे सन्मान करणारा राज्यातील पहिलाच पुरस्कार असून गेल्या वर्षापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला असून पहिला पुरस्कार संगमेश्वर येथील रामचंद्र राणे दांपत्यास देण्यात आला होता.

जुन्नर तालुक्यातील हडसर किल्ल्यावर अमोल ढोबळे नोकरी सांभाळून दुर्ग संवर्धनाची कार्य गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. यात त्यांच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. चुलते मारुती ढोबळे यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे अमोल ढोबळे यांनी सांगितले. तरुणाईच्या हातून दुर्ग संवर्धनाची कार्य घडावे याच ध्येयाने झपाटलेल्या शिवाजी ट्रेल संस्थेने आता एक पाऊल पुढे टाकत मावळ्यांच्या पालकांचा गौरव करण्याचे ठरवले आहे.