जुन्नरला ११ ग्रामपंचायतींच्या 
जागा पुन्हा राहणार रिक्त

जुन्नरला ११ ग्रामपंचायतींच्या जागा पुन्हा राहणार रिक्त

जुन्नर, ता. २८ : जुन्नर तालुक्यातील पोटनिवडणुका होत असलेल्या ४४ ग्रामपंचायतींपैकी उमेदवारी अर्ज न आल्याने ११ ग्रामपंचायतींच्या जागा पुन्हा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे येथे पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे.
काले, भिवाडे बुद्रुक, खिलारवाडी, उंडेखडक, मढ, माणिकडोह, अंजनावळे, सुलतानपूर, सोमतवाडी, खानापूर, वानेवाडी या ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या रिक्त जगसंसाठी एकही अर्ज आला नाही. वानेवाडीच्या थेट सरपंच व सदस्य पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज आला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारचा (ता. २)शेवटचा दिवस होता.
हातवीज- तीन, इंगळूण- दोन ,अलदरे- एक, उच्छिल- एक, दातखळवाडी- दोन, गोद्रे- दोन, राजूर- दोन, आपटाळे- एक, येणेरे- दोन, चावंड- एक, पूर- एक, नळवणे- एक, पारगावतर्फे मढ- चार, अहिनवेवाडी- एक, वारूळवाडी- चार, मंगरूळ- पाच, अशा एकूण ३३ जागांसाठी ३५ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. चावंड व नळावणे येथील प्रत्येकी एक जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्जाची छाननी बुधवारी (ता. ३) होणार असून, उमेदवारी अर्ज ८ मे रोजी दुपारी ३ पर्यंत माघारी घेता येणार आहे. त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. १८ मे रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान व मतमोजणी १९ मे रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com