Crime News
Crime Newsesakal

Pune Crime: धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवत लैंगिक आत्याचार

जुन्नर, ता. ६ : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून राहते घरी वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी नितीन देवराम शेळकंदे याच्याविरुद्ध जुन्नर पोलिसांनी पॉस्को व आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने दिली असून, नोव्हेंबर २२ ते मार्च २३ या काळात आरोपीने गोड बोलून विविध ठिकाणी नेऊन बलात्कार केला. तसेच इन्स्टाग्राम अकाउंटवर अश्लील फोटोची पोस्ट करून बदनामी केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत पोलिस निरिक्षक नारायण पवार हे पुढील तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com