मीना खोरे संघर्ष समितीचे उपोषण

मीना खोरे संघर्ष समितीचे उपोषण

जुन्नर, ता. ३१ : मीना खोऱ्या‍तील पाण्यापासून वंचित असणाऱ्या सावरगाव (ता. जुन्नर) परिसरातील गावांच्या पाणी प्रश्नांसाठी मीना खोरे संघर्ष समितीच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

गेल्या ३२ वर्षापासून सुरू असलेल्या ह्या लढ्यासाठी आयोजित या उपोषणास सावरगाव-निमदरी परिसरातील ग्रामस्थांनी गावातील व्यवहार बंद ठेवत उपोषणास पाठिंबा दिला.

तहसील कार्यालयासमोर शेतकरी व ज्येष्ठ नागरिक महिला, तरुण व विविध गावाचे सरपंच व राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

माजी आमदार शरद सोनवणे, श्री विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अमित बेनके व शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, आशा बुचके, बाबा परदेशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास हांडे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष पापा खोत आदींनी या उपोषणास पाठिंबा दिला.

"आजच्या मीना खोरे संघर्ष कृती समितीच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास दहा बारा गावांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. वरिष्ठ कार्यकारी अभियंता राजेंद्र तोडपकर यांच्या विनंतीमुळे उपोषण आम्ही सर्वजण मागे घेत आहोत. मात्र १५ ऑगस्ट पर्यत योग्य निर्णय झाला नाही तर आम्ही सर्वजण स्वातंत्र दिनीच सावरगावच्या मीना नदीत जलसमाधी घेणार आहोत. त्यामुळे सरकारने या पाणी प्रश्नांचा गांभीर्याने विचार करावा ही विनंती.
- प्रशांत पाबळे, सचिव, मीना खोरे संघर्ष कृती समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com