जुन्नर येथील शिबिरात 
१७५ जणांचे रक्तदान

जुन्नर येथील शिबिरात १७५ जणांचे रक्तदान

Published on

जुन्नर, ता. १७ : येथील श्री वल्लभ नागरी पतसंसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सी. बी. गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १७५ जणांनी रक्तदान केल्याची माहिती अध्यक्ष सुमीत परदेशी यांनी दिली.
संस्थेचे मार्गदर्शक आमदार अतुल बेनके, माजी अध्यक्ष सतीश परदेशी, अशोक गांधी, फिरोज पठाण, पापा खोत, उज्ज्वला शेवाळे, सुहास चिखले, भाऊ कुंभार, नितीन गांधी, डी. एल. म्हस्के व संचालकांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्‍घाटन झाले. यावेळी पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार व कर्मचारी उपस्थित होते.
पतसंस्थेकडून सर्व रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात आले. जुन्नर शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले. गांधी यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने दरवर्षी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष परदेशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com